शालेय अभिलेखे

                                                                  शालेय अभिलेखे 

         शालेय व्यवस्थापनात मुख्याध्यापकाच्या कार्यालयात ठेवण्यात येणाऱ्या अभिलेख्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.शालोपयोगी सर्व अभिलेखे तयार करणे व ते अदयावत ठेवणे हे मुख्याध्यापकांचे कर्तव्य आहे . शासकीय यंत्रणेने ठरवून दिलेल्या नमुन्यानुसार व निर्देशानुसार अभिलेखे ठेवल्यास कार्यात एकसूत्रता व सुसंगतपणा येऊन ते कामाच्या दृष्टीने सोयीचे होते .
               शालेय दप्तरांना बंदिस्त कपाटात अनुक्रमांकानुसार व विद्यार्थी,पालक,शिक्षक व शासन अशा वर्गीकरणानुसार ठेवल्यास नोंदीच्या वेळी ते सोयीस्कर होते .
               शालेय अभिलेखे अथवा नोंदपत्रके यावरून शाळेची सद्यस्थिती समजते . शैक्षणिक कार्याची माहिती मिळते. शालेय विद्यार्थ्यांचे योग्य वर्गीकरण करता येते.विद्यार्थ्याची योग्य माहिती ठेवता येते.कायदेविषयक बाबींची पूर्तता नोंदीमुळे होते .शैक्षणिकदृष्ट्या शाळेच्या प्रशासनाची माहिती मिळते .विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास कळण्यास मदत होते .

 प्रत्येक अभिलेख मुख्याध्यापकांनी खालीलप्रमाणे प्रमाणित करावा .




प्रमाणपत्र
प्रमाणित करण्यात येते की सदरहू रजिस्टरमध्ये क्र. १ ते ------------- इतकी पृष्ठे आहेत .
                                     

                                                       मुख्याध्यापक

                                                     स्वाक्षरी व शिक्का  



                                           शाळा स्तरावर ठेवावयाचे अभिलेखे


    विद्यार्थी संदर्भातील अभिलेखे


मुख्याध्यापक व शिक्षक संदर्भातील अभिलेखे

     वित्तीय संदर्भातील अभिलेखे

डाउनलोड करा

1 comment:

  1. अतिशय उपयुक्त माहिती संकलन केलेले आहे. नोकरीसंदर्भातील माहितीकरता क्लिक करा माय मेगाभरती

    ReplyDelete