☺ विविध प्रकारच्या वस्तू मोजतो
वस्तूंचे समान गटात रूपांतर करतो
उरलेल्या वस्तू बाहेर काढतो
सांगा पाहू मी कोण ? - भागाकार
☺वस्तूंची पुन्हा पुन्हा बेरीज करतो .
समान गट एकत्र करतो
पाढ्यांच्या मदतीने मी उत्तर काढतो . सांगा पाहू मी कोण ? - गुणाकार
☺वस्तू मी जमा करतो, सर्वांना एकत्र करतो.
दोन्ही गट मिळून उत्तर सांगतो.
सांगा पाहू मी कोण ? - बेरीज
☺ गटातून सांगितलेल्या वस्तू बाहेर काढतो.
वस्तू मी संख्येने कमी करतो.
शिल्लक वस्तू मोजून पटकन उत्तर सांगतो.
सांगा पाहू मी कोण ? - वजाबाकी
No comments:
Post a Comment