शैक्षणिक व्याख्या

संदर्भ क्षमता : आपल्या कार्याशी संबंधित कर्तव्ये उद्दिष्टनुरूप पार पाडताना त्या कार्याचा इतिहास , पार्श्वभूमी, सद्यस्थिती व उद्दिष्ट्ये यांचे विविध संदर्भ जाणण्याची व त्यायोगे स्वतः प्रेरित करण्याची क्षमता म्हणजेच संदर्भ क्षमता

संबोध क्षमता : शिक्षणातील सिद्धांत आणि विविध विचारप्रवाह ,पद्धती ,तंत्रे व संज्ञा यांच्याबद्दल पूर्ण वैचारिक स्पष्टता असणे म्हणजे संबोध क्षमता.

अभ्यासक्रम : अभ्यासक्रम म्हणजे शिक्षणाची उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी शाळेच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना द्यावयाच्या सुनियोजित अध्ययन अनुभवांचा आराखडा होय.

पाठ्यक्रम : पाठ्यक्रम म्हणजे अभ्यासक्रमात अंतर्भूत केलेल्या प्रत्येक विषयातील आशयाची क्रमबद्ध मांडणी होय .

क्षमता : प्रत्येक व्यक्तींमधील उपजत गुण व सुप्त शक्तींचे उपयोगितेत होणारे रूपांतर म्हणजे क्षमता

अध्ययन निष्पत्ती : विद्यार्थ्यांच्या प्रारंभिक वर्तनात अध्ययन - अध्यापन प्रक्रियेमुळे घडून आलेल्या इष्ट बदलास अध्ययन निष्पत्ती असे म्हणतात.

No comments:

Post a Comment