गणित

   ☺  विविध प्रकारच्या  वस्तू मोजतो
    वस्तूंचे समान गटात रूपांतर करतो
    उरलेल्या वस्तू बाहेर काढतो
    सांगा पाहू मी कोण ?  -  भागाकार 

☺वस्तूंची पुन्हा पुन्हा बेरीज करतो .
   समान गट एकत्र करतो 
 पाढ्यांच्या मदतीने मी उत्तर काढतो .                                           सांगा पाहू मी कोण ?   -  गुणाकार 

☺वस्तू मी जमा करतो, सर्वांना एकत्र करतो.
दोन्ही गट मिळून उत्तर सांगतो.
सांगा पाहू मी कोण ?    - बेरीज

☺ गटातून सांगितलेल्या वस्तू  बाहेर काढतो.
     वस्तू मी संख्येने  कमी करतो.
शिल्लक वस्तू मोजून पटकन उत्तर सांगतो. 
सांगा पाहू मी कोण ?  - वजाबाकी 
शिल्लक वस्तू मोजून  पटकन उत्तर सांगतो


No comments:

Post a Comment