अवतीभवती 😎
-----------------------------------
बाटलीबंद पाणी 🍼
-----------------------------------
सध्या बाटलीबंद पाणी धंदा जोरात आहे.
कोणत्याही छोट्या मोठ्या हॉटेल मध्ये गेले की पाणी बिसलरी आणून टेबलावर ठेवतात.पाणी कोणते देऊ विचारायची तसदी घेत नाही. पूर्वी चे दिवस आठवतात माणुसकीत, संस्कृतीत किती फरक पडला आहे. लहानपणी एखादया हॉटेलात गेलो की लगेच वेटर पळत यायचा भला मोठा मग (जग) घेऊन लगेच चार ग्लासात पाणी
गि-हाईकाला भरुन द्यायचा नाहीतर चार बोटे चार ग्लासात अडकवून पाणी टेबलावर धडकन
आदळायचा पाणी अंगावर उडायचे पाणी मोफत देणे,स्वच्छ देणे प्रत्येक व्यावसायिकाचे कर्तव्य आहे. पण ते कुणी बजावतांना दिसत नाही. आपणही लगेच सगळीकडे सांगत सुटतो हो मला बिसलरीच्या शुद्ध पाण्याशिवाय जमत नाही हो.
आमच्या सौ व आम्ही हॉटेल मध्ये जेवायला गेलो की सौ. हळूच घरून आणलेल्या पाण्याच्या बाटल्या टेबलावर ठेवायच्या लगेच आमच्या मुली इकडे तिकडे बघायच्या आई काय हे? लोक नावे ठेवतील घरून पाण्याच्या बाटल्या घेऊन आले.अडाणीच आहेत.म्हणू द्या लोकांना आहोतच आम्ही खेड्यातले!
बर असू दे मोठयाने बोलू नको लोक ऐकतील.
एखादया दिवशी हॉटेलात गेलो व सौ. पाणी घरुन आणायच्या विसरल्या तर मुली लगेच बिसलरी द्या म्हणून वेटरला सांगायच्या जेवण करायचे मस्तपैकी लगेच पाणी पिऊन हात पुसून बचकभर बडीशेप हातात घेऊन तोंडात टाकायच्या बील दिले की निघाले घरी मी मात्र बिसलरीत उरलेले पाणी घेऊन बाहेर पडायचो काय बाबा! कशाला उरलेले पाणी घेतले.लोक बघतील तर काय म्हणतील त्यांना सांगा उरलेले पाणी घरी परसातील झाडांना तरी उपयोगी पडेल असे आहे तर घ्या घ्या द्या आमच्या कडे
गंमतच आहे ना पाण्याच्या बाटल्यांची 😀
-----------------------------------
कैलास भागवत, संगमनेर
No comments:
Post a Comment