म्हणी

म्हणी
१) आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार ? -  जे मुळात  आस्तित्वातच नाही त्याची थोडी देखील अपेक्षा करणे व्यर्थ होय.
२) इकडे आड तिकडे विहीर - दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडणे
३) उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग - उतावळेपणाने मूर्खा सारखे वर्तन करणे
४) एक ना धड भाराभर चिंध्या - एकाच वेळी अनेक कामे स्वीकारल्यामुळे शेवटी कोणतेही काम पूर्ण न होणे
५) करावे तसे भरावे - दुष्कृत्य करणाऱ्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतातच.
६) खाई त्याला खवखवे. - जो वाईट काम करतो त्याला मनात धास्ती वाटते .
७) गर्वाचे घर खाली. - गर्विष्ठ माणसाला शेवटी पराभव किंवा अपमान स्वीकारावा लागतो.
८) घरोघरी मातीच्या चुली. - सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे .
९) चोर सोडून संन्यासाला सुळी देणे . - अपराध्याला सोडून निरपराध्याला शिक्षा देणे .
१०)  जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही . - मूळचा स्वभाव कधीच बदलत नाही .
११ ) झाकली मुठ सव्वा लाखाची - मौन पाळून अब्रू राखणे .
१२ ) ताकापुरती आजीबाई - स्वार्थ साधण्यापुरतेच एखाद्याचे गुणगान करणे .
१३ ) थेंबे थेंबे तळे साचे - थोडे थोडे साठवत राहिल्याने काही दिवसांनी त्याचा मोठा साठा होतो .
१४ ) दगडापेक्षा वीट मऊ - मोठ्या संकटापेक्षा लहान संकट सुसह्य वाटणे .
१५ ) न कर्त्याचा वार शनिवार - अनेक सबबी सांगून कामाची टाळाटाळ करणे .
१६ ) पळसाला पाने तीनच - कोठेही गेले तरी परिस्थिती तीच असणे .
१७ ) बळी तो कान पिळी - बलवान माणूस इतरांवर हुकमत गाजवतो .
१८ ) मनी वसे ते स्वप्नी दिसे - जशी इच्छा असेल तशी स्वप्ने पडणे .
१९ ) वासरात लंगडी गाय शहाणी - अडाणी लोकांत अर्धवट शहाण्याला मोठेपण लाभते .
२० ) रात्र थोडी सोंगे फार - कामे पुष्कळ , पण ती पार पाडायला वेळ न पुरणे .
२१ ) लेकी बोले सुने लागे - एकाला उदेशून पण दुसऱ्याला लागेल असे बोलणे .
२२ ) साखरेचे खाणार त्याला देव देणार - भाग्यवान माणसाला सर्व परिस्थितीच अनुकूल असते .
२३ ) हाजीर तो वजीर - जो वेळेवर हजर राहील त्यालाच संधीचा फायदा होईल.
२४ ) डोंगर पोखरून उंदीर काढणे - अतोनात श्रमानंतर अत्यल्प फायदा होणे .
२५ ) आलिया भोगासी असावे सादर - जे नशिबात असेल ते भोगायला तयार असणे .
२६ ) उचलली जीभ लावली टाळ्याला - विचार न करता वाटेल ते अमर्यादपणे बोलणे .
२७ ) कामापुरता मामा - गरजेपुरता गोड बोलणारा , मतलबी माणूस .
२८ ) खायला काळ भुईला भार - निरोद्योगी मनुष्य सर्वांना भारभूत होतो .
२९ ) गरज सरो , वैद्य मरो - आपले काम संपताच उपकार कर्त्याला विसरणे .
३० ) चोरावर मोर - एखाद्याच्या कृत्यावर सवाई कृत्य करून मात करणे .
३१ ) दाम करी काम - पैशाने सर्व कामे साध्य होणे .

No comments:

Post a Comment