गुरुवर्य सप्तरंगी परिपाठ

🌸🌷🌸🌷🌸🌷🌸🌷
------------------------------------------ 
  🎄 *आजचा परिपाठ🎄
-----------------------------------------
         🔅 *पंचांग* 🔅
 तिथी - अश्विन द्वितीया 
 पक्ष - शुक्ल  
 शके - १९४७
 नक्षत्र : हस्त 
 सूर्योदय - ६ वा.३०मि.
 सूर्यास्त - ६ वा.३२ मि.
 दिनांक - २३ / ९ /२०२५
 वार - मंगळवार 
 महिना : सप्टेंबर  
----------------------------------------
      🔅 *सुविचार* 🔅
ज्ञान तेथे मान 
Respect  the  knowledge there 
------------------------------------------
       🔅 दिनविशेष 🔅 
२३ सप्टेंबर महत्वाच्या घटना :
१८०३: 
दुसरे इंग्रज-मराठा युद्ध सुरू झाले, ज्यामध्ये आसईची लढाई झाली. 
१८८९: 
जपानी व्हिडिओ गेम्स बनवणारी कंपनी निनटेंडोची स्थापना झाली. 
२००२: 
मोझिला फायरफॉक्स या इंटरनेट ब्राउझरची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. 

२३ सप्टेंबर जन्मदिन : 
                  १९१९: पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, शिक्षणतज्ञ देवदत्त दाभोळकर यांचा जन्म
                   १९२०: नाट्य लेखक व अभिनेते भालबा केळकर यांचा जन्म.

१९४३: अभिनेत्री तनुजा यांचा जन्म.

१९५०: समाजशास्त्रज्ञ डॉ. अभय बंग यांचा जन्म.

१९५२: क्रिकेटपटू अंशुमान गायकवाड यांचा जन्म.

१९५७: पार्श्वगायक कुमार सानू यांचा जन्म.

२०००: भारतीय रायफल नेमबाज - सुवर्ण पदक विजेते श्रेया अग्रवाल यांचा जन्म

२३ सप्टेंबर निधन :

१८५८: मराठ्यांचा इतिहास लिहिणारा ब्रिटिश अधिकारी ग्रँट डफ यांचे निधन. 
१८७०: फ्रेंच लेखक, इतिहासकार आणि पुरातत्त्वज्ञ प्रॉस्पर मेरिमी यांचे निधन. 
१८८२: जर्मन रसायनशास्त्रज्ञ फ्रेडरिक वोहलर यांचे निधन.
१९३९: आधुनिक मानसशास्त्राचा जनक सिग्मंड फ्रॉईड यांचे निधन
१९६४: नाटककार भार्गवराम विठ्ठल तथा मामा वरेरकर यांचे निधन.
१९९९: मराठी चित्रपट, जाहिरातपट निर्माते गिरीश घाणेकर यांचे निधन.

-----------------------------------------
       🔅 *बातम्या* 🔅 
 
अफगाणिस्तानातील एक मुलगा विमानाच्या चाकाजवळ बसून काबुलहून दिल्लीला पोहचल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दिल्ली एअरपोर्टच्या टर्मिनल तीनवर अधिकाऱ्यांना या मुलाला प्रतिबंधिच क्षेत्रात फिरताना पाहिले आणि त्याची चौकशी केली त्यानंतर त्याने हा धक्कादायक खुलासा केला आहे.

ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि कॅनडा या तीन देशांनी पॅलेस्टाईनला एक राष्ट्र म्हणून मान्यता दिली आहे. इस्रायलने मात्र याला मान्यतेवर आक्षेप नोंदवला आहे. 


आशिया कप स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा दुसऱ्यांदा धुव्वा उडवला. हा पराभव इतक्यावरच थांबला नाही. भारताने फुटबॉल मैदानातही पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. पाकिस्तानचं भारतासमोर काही एक चाललं नाही.

महाराष्ट्रात सध्या मुसळधार पावसाचा जोर आहे. या पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. बीड जिल्ह्यातील सिंदफणा नदीला पूर आल्याने अनेक घरे आणि दुकाने पाण्याखाली गेली आहेत. शेतीचेही प्रचंड नुकसान झाले आहे. 

या वर्षीचं सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ रागासा फिलिपिन्समध्ये धडकलं आहे. फिलिपिन्समध्ये सध्या प्रति तास 270 किमी वेगानं वारं वाहत आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर धोकादायक क्षेत्रातील तब्बल दहा हजार लोकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलं आहे. 

------------------------------------------
  🎄 **व्यक्तीविशेष* 🎄 
     🔅अभय बंग 🔅
अभय बंग हे मराठी वैद्यकीय संशोधक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. ते सर्च या संस्थेमार्फत गडचिरोली येथे ग्रामीण आणि आदिवासी भागात वैद्यकीय सेवा, संशोधन आणि सामाजिक कार्य करतात. त्यांच्या बालमृत्यू नियंत्रणावरील संशोधनाला जागतिक मान्यता मिळाली असून, भारत, पाकिस्तान, नेपाळ, बांग्लादेश आणि अनेक आफ्रिकन देशांमध्ये त्यांचे मॉडेल वापरले जाते. त्यांचे लेख वैद्यकीय नियतकालिक द  लन्सेट मध्ये प्रकाशित झाले आहेत. त्यांचे माझा साक्षात्कारी हृदयरोग हे पुस्तकही प्रसिद्ध आहे.
अभय बंग यांचा जन्म वर्धा येथे गांधीवादी कार्यकर्ते ठाकुरदास आणि सुमन बंग यांच्या कुटुंबात झाला. त्यांचे वडील गांधीजींच्या प्रेरणेने खेड्यांमध्ये कार्यरत होते. अभय यांचे शिक्षण वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमात नयी तालीम  पद्धतीने झाले.
दारूबंदी चळवळ: अभय बंग यांनी १९८८ मध्ये गडचिरोलीत दारूबंदी चळवळ यशस्वी केली. महिलांच्या जागरण यात्रेतून दारूच्या समस्येवर प्रकाश पडला. १०४ गावांमधील अभ्यासानंतर स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक नेत्यांच्या सहकार्याने त्यांनी दारूबंदी लागू केली.बालमृत्यू नियंत्रण: त्यांनी नवजात बालकांच्या मृत्यूच्या कारणांचा अभ्यास करून उपाययोजना सुचवल्या. त्यांचे संशोधन लॅन्सेटमध्ये प्रकाशित झाले आणि जागतिक आरोग्य संघटनेने त्याचा स्वीकार केला.स्त्री आरोग्य: गडचिरोलीतील दोन गावांमधील संशोधनातून त्यांनी सिद्ध केले की ९२% स्त्रियांना गायनॅकॉलॉजिकल आजार आहेत. यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने "मदर अँड चाईल्ड हेल्थ" ऐवजी "वूमन अँड चाईल्ड हेल्थ" ही घोषणा स्वीकारली.सिकल सेल रोग: आदिवासींमधील सिकल सेल रोगावर त्यांनी संशोधन केले.सर्च संस्था: १९८८ मध्ये स्थापन केलेल्या सर्च संस्थेमार्फत त्यांनी ५८ गावांतील ४८,००० लोकांना वैद्यकीय सेवा पुरवल्या. अशिक्षित महिलांना प्रशिक्षण देऊन आरोग्यदूत म्हणून कार्यरत केले.
---------------------------------------
   🎄 *सामान्यज्ञान* 🎄
      आयुर्वेदिक वनस्पती 
         🔅 तुळस 🔅 
तुळशीचे अनेक औषधी उपयोग आहेत. ही रोगप्रतिकारशक्ती वाढवते, पचन सुधारते, तणाव कमी करते, तसेच सर्दी, खोकला आणि त्वचेच्या संसर्गांवर उपचार करण्यास मदत करते. तुळशीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आहेत, जे व्हायरल आणि बॅक्टेरियाजन्य संसर्ग रोखण्यास मदत करतात
----------------------------------------
      🔅 *वाक्प्रचार* 🔅
अंगात वीज संचारणे -अचानक खूप बळ येणे.
----------------------------------------
         🔅 *म्हण* 🔅
अति तेथे माती 
- कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करणे वाईट असते. 
-----------------------------------------
       🔅इंग्रजी प्रश्न 🔅

1)What is the color of lemon?

Answer : Yellow

2)What is the color of buffalo?

Answer : Black

3)What is the color of milk ?

Answer : White

4) What colur is the sky ?

Answer : Blue

5)What color is the parrot?

Answer : Green

------------------------------------------
       🎄 *प्रार्थना*🎄 
🔅खरा तो एकचि धर्म। 🔅

खरा तो एकचि धर्म। जगाला प्रेम अर्पावे ।।धृ।।
जगी जे हीन अति पतित

जगी जे दीन पद दलित
तया जाऊन उठवावे। जगाला प्रेम अर्पावे ।।१।
सदा जे आर्त ‍अति विकल
जयांना गांजती सकल
तया जाऊन हसवावे। जगाला प्रेम अर्पावे ।।२।।
कुणा ना व्यर्थ शिणवावे
कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्ता बंधु मानावे। जगाला प्रेम अर्पावे ।।३।।
प्रभूची लेकरे सारी
तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे। जगाला प्रेम अर्पावे ।।४।।
असे हे सार धर्माचे
असे हे सार सत्याचे
परार्था प्राणही द्यावे। जगाला प्रेम अर्पावे  ।।५ ।।

                                                             गीतकार – साने गुरुजी 

-----------------------------------------
      🔅मनाचे श्लोक 🔅
दिनाचा दयाळू मनाचा मवाळू।
स्नेहाळू कृपाळू जनीं दासपाळू॥
तया अंतरी क्रोध संताप कैंचा।
जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५६॥

जगीं होइजे धन्य या रामनामे।
क्रिया भक्ति ऊपासना नित्य नेमे॥
उदासीनता तत्त्वता सार आहे।
सदा सर्वदा मोकळी वृत्ति राहे ॥५७॥

नको वासना वीषयीं वृत्तिरुपें।
पदार्थी जडे कामना पूर्वपापें॥
सदा राम निष्काम चिंतीत जावा।
मना कल्पनालेश तोहि नसावा॥५८॥

मना कल्पना कल्पितां कल्पकोटी।
नव्हे रे नव्हे सर्वथा रामभेटी॥
मनीं कामना राम नाही जयाला।
अती आदरे प्रीती नाही तयाला॥५९॥
मना राम कल्पतरु कामधेनु।
निधी सार चिंतामणी काय वानूं॥
जयाचेनि योगे घडे सर्व सत्ता।
तया साम्यता कायसी कोण आतां॥६०॥
------------------------------------------
     🎄 बडबडगीत 🌲 
🔅पप्पा सांगा कुणाचे?🔅
पप्पा सांगा कुणाचे? पप्पा माझ्या मम्मीचे
मम्मी सांगा कुणाची? मम्मी माझ्या पप्पांची ।।धृ।।

इवल्या इवल्या घरट्यात, चिमणा चिमणी राहतात
चिमणा-चिमणी अन्‌ भवती, चिमणी पिल्लेही चिवचिवती ।।१।।

आभाळ पेलते पंखांवरी, पप्पांना घरटे प्रिय भारी
चोचीत चोचीने घास द्यावा, पिल्लांचा हळूच पापा घ्यावा ।।२।।

पंखाशी पंख हे जुळताना, चोचीत चोचही मिळताना
हासते नाचते घर सारे, हासते छ्प्पर, भिंती, दारे ।।३।।
------------------------------------------
         🌲समूहगीत🌲
🔅उंच उंच गगनात तिरंगा
उंच उंच गगनात तिरंगा डौलाने फडकतो हृदयातून जयहिंद, हृदयातून जयहिंद भारतीय सूर एक नांदतो ||धृ || उंच उंच गगनात तिरंगाssss

भारत माता जन्मदायिनी अमृत पुत्रांची राष्ट्रपुरुष घडविता भूमिका तुझी जिजाईची तुझ्या कीर्तीचा अवनीवरती सुगंध दरवळतो || १ || उंच उंच गगनात तिरंगाssss

नंदनवन तू रम्य मनोहर समग्र विश्वाचे वसुंधरा तू मुळात सुंदर प्रतिक ऐक्याचे आम्रतरु जणू वात्सल्याची नित्य सावली देतो || २ || उंच उंच गगनात तिरंगाssss

मनमंदिरी स्थान आईला, नित्य आम्ही दिधले उत्थानासाव भारतभूच्या जीवन वेचू आपले तिची कस्तुरी गंधित माती, भाळावर लावतो || ३ || उंच उंच गगनात तिरंगाssss

उंच उंच गगनात तिरंगा डौलाने फडकतो हृदयातून जयहिंद, हृदयातून जयहिंद भारतीय सूर एक नांदतो उंच उंच गगनात तिरंगाssss
-----------------------------------
      🌲 *बोधकथा*🌲
🔅  चतुर मांजर   🔅

एकदा एक कोल्हा आणि मांजर शिकारी कुत्र्या बद्दल बोलत होते.

कोल्हा म्हणाला, "मला शिकारी कुत्र्यांच्या खूप राग येतो.""मलाही येतो." मांजर म्हणाली.कोल्हा म्हणाला, "ते खूप वेगाने धावतात. पण ते मला पकडू शकत नाहीत. मला त्यांच्यापासून दूर पळण्याच्या अनेक युक्त्या माहित आहेत.""तू कोण कोणत्या युक्त्या करतोस?" मांजरीने विचारले."अनेक युक्त्या!" कोल्हा फुशारकी मारत म्हणाला, "कधी मी काटेरी झुडपातून धावतो. कधीकधी जंगलातल्या दाठ झुडपात जाऊन बसतो. तर कधी मोठ्या बिळात लपून बसतो. अशा अनेक युक्त्या माझ्याकडे आहेत."मांजर म्हणाली,"मला तर फक्त एक चांगली युक्ती माहित आहे."

"अरेरे! फक्त एकच युक्ती? ती कोणती आहे?" कोल्हाने विचारले.

"बघच आता! आता मी तीच युक्ती करणारच आहे. ते पहा, शिकारी कुत्रे इकडेच येत आहेत. " असे म्हणत मांजर जवळच्याच एका झाडावर चढून बसली. तिथे ती शिकारी कुत्र्यापासून अगदी सुरक्षित राहिली. शिकारी कुत्र्यांनी कोल्ह्याचा पाठलाग सुरू केला. कोल्हा एकामागून एक युक्त्या वापरत होता. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. अखेरीस शिकारी कुत्र्यांनी त्या कोल्ह्याला पकडले आणि ठार मारले.मांजर मनात म्हणाली,. "बिचारा कोल्हा! त्याच्या अनेक युक्त्या पेक्षा माझी एकच युक्ती चांगली होती."

तात्पर्य: कोणत्याही एकाच विषयात प्रवीण व्हा, नाहीतर एक ना धड भाराभर चिंध्या. 

------------------------------------------
       🔅 प्रश्नमंजुषा 🔅

१)घोड्याच्या निवा-याला काय म्हणतात?- तबेला

२) कोंबड्याच्या निवा-याला काय म्हणतात ?- खुराडे

३) मधमाशीच्या निवा-याला काय म्हणतात ?- पोळे

४) मुंग्याच्या निवा-याला काय म्हणतात ?  - वारूळ

५) गायीच्या निवा-याला काय म्हणतात ?- गोठा

🔸🔸  🔸🔸🔸🔸🔸🔸
-----------------------------------------

42 comments:

  1. एक परिपूर्ण ब्लॉग ...👌👌

    ReplyDelete
  2. अतिशय सुंदर व परिपूर्ण रचना केलेली आहे. अभिनंदन भागवत सर.💐💐👌👌💐💐👌👌

    ReplyDelete
  3. खूप छान सर 👌👌

    ReplyDelete
  4. दैनंदिन परिपाठ उपक्रम हे विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या भावी आयुष्यातील वाटचालीस नकळत संस्कार प्रदान करत असते,आणि एक सज्जन नागरिक तयार होण्यास याच संस्कारांची अत्यन्त गरज आहे, आणि तेच संस्कार परिपाठ या माध्यमातून आपण देत असतो, तुमचे दैनंदिन परिपाठ आम्हाला खूप उपयुक्त ठरते, thanks bhagwat sir,

    ReplyDelete
  5. आपला परीपाठ इंग्रजी मधून मीळतो का ?

    ReplyDelete
  6. खूप खूप छान माहिती असते...

    ReplyDelete
  7. खूपच सुंदर परिपाठ,,,

    ReplyDelete
  8. खूपच छान दैनिक परिपाठ रचना आहे. प्रत्येक घटकाचा अंतर्भाव आहे.

    ReplyDelete
  9. अतिशय सुंदर व परिपूर्ण रचना केलेली आहे. अभिनंदन भागवत सर.💐💐👌👌💐💐👌👌

    ReplyDelete
  10. खुप छान सर

    ReplyDelete
  11. अतिशय परिपूर्ण असा दैनिक परिपाठ असतो. द्यावेत तेवढे धन्यवाद कमीच आहेत. एक विनंतीवजा सूचना करावीशी वाटते- सुविचार आणि सामान्य ज्ञान प्रश्न यांमध्ये पुनरावृत्ती होऊ नये.

    ReplyDelete
  12. Thank sirji 🙏गुरुवर्य सप्तरंगी परिपाठ शिक्षकांसाठी एक मार्गदर्शक म्हणून काम करत आहे. आपण आपल्या पद्धतीने, कल्पकतेने त्यात बदल करून शाळेत परिपाठ घ्यावा.

    ReplyDelete
  13. कृपया सुविचार व सामान्य ज्ञान मधील प्रश्न सतत तेच तेच येत आहेत, त्यांची पुनरावृत्ती होऊ नये, ही अपेक्षा!

    ReplyDelete
  14. खूप छान आहे

    ReplyDelete
  15. अतिशय सविस्तर व उपयुक्त परिपाठ

    ReplyDelete
  16. अतिशय सुंदर

    ReplyDelete