परिपाठ संपला विद्यार्थी वर्गात आले. हजेरी घेतली. मुलींनी एकच गलका केला सर आज दिव्या चा वाढदिवस आहे. अरे वा ! दिव्याला जवळ बोलावले खरच तुझा वाढदिवस आहे. दिव्या हो म्हणाली वाढदिवसाला मुलांना वाटण्यासाठी पप्पा चाॅकलेट देणार आहेत दिव्याने आनंदाने सांगितले . दिव्या वडील चाॅकलेट चा पुडा आणतील म्हणून चातकासारखी वाट पहात होती पण बराच वेळ झाला वडील आले नाही दिव्या नाखुश झाली
शाळेत वाढदिवसानिमित्त मुले चाॅकलेट, बिस्कीट वाटतात आज मला चाॅकलेट वाटायचे आहेत असे दिव्याला मनोमन वाटत असावे तिच्या अंतरीची भावना जाणली. दिव्याला जवळ बोलावले विद्यार्थ्याना सांगितले आज दिव्याचा वाढदिवस आहे आपण सर्वजण तिला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊ या ! सर्व मुलांनी दिव्याला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या जवळच्या जनरल स्टोअर्स मध्ये गेलो, दिव्याला वही व चाॅकलेट चा पुडा घेतला वाढदिवसानिमित्त वही भेट दिली , व हातात चाॅकलेट चा पुडा ठेवला. दिव्याला खूपच आनंद झाला. चेहऱ्यावर हास्य फुलले दिव्याला म्हटले जा दिव्या सर्व वर्गातील विद्यार्थ्यांना चाॅकलेट वाटप कर दिव्या हसली सर्व मुलांना चाॅकलेट वाटू लागली. दिव्याच्या निरागस चेहऱ्यावरील हास्य, आनंद मनाला खूपच सुखावून गेला. वाढदिवसाच्या दिवशी शाळेतील आपल्या मित्रमैत्रिणींना खाऊ देण्यामागे जी दातृत्वाची भावना मुलांची असते ती खरोखरच वाखण्याजोगी असते आपण समाजाचे देणे लागतो ही दानशूरपणाची भावना मुलांमध्ये असते. हीच भावना मला दिव्यात दिसली.सुख वाटून घेतले म्हणजे शिक्षणातून जगण सुकर होतं असेच दातृत्वाचे संस्कार मराठी शाळेत मुलांवर नकळत बिंबवले व रूजवले जातात. हाच खरा मुल्यसंस्काराचा ठेवा !
कैलास भागवत (प्राथमिक शिक्षक)
जि.प.प्राथ.शाळा आंबीखालसा
ता.संगमनेर जि.अ.नगर