मराठी प्रश्नमंजूषा


१)फुलांचा राजा कोणाला म्हणतात?
- गुलाब 
२)फळांचा राजा कोणाला म्हणतात?
- आंबा 
३)प्राण्यांचा राजा कोणाला म्हणतात?
- सिंह 
४) पक्ष्यांचा राजा कोणाला म्हणतात?
- गरूड
५)ऋतूंचा राजा कोणाला म्हणतात?
- वसंत
६) भारताची राजधानी कोणती?
-  नवी दिल्ली 
७)  महाराष्ट्राची राजधानी कोणती?
- मुंबई 
८) महाराष्ट्राची उपराजधानी कोणती?
- नागपूर 
९) विद्येचे माहेरघर कोणत्या शहराला म्हणतात ?
- पुणे 
१०) सात बेटांचे शहर कोणत्या शहराला म्हणतात ?
- मुंबई 

११) घोड्याच्या निवा-याला काय म्हणतात?

- तबेला
१२) कोंबड्याच्या निवा-याला काय म्हणतात ?
- खुराडे 
१३) मधमाशीच्या निवा-याला काय म्हणतात ?
- पोळे
१४) मुंग्याच्या निवा-याला काय म्हणतात ?
  - वारूळ
१५) गायीच्या निवा-याला काय म्हणतात ?
- गोठा
१६) जादूचा खेळ करणा-याला काय म्हणतात?

- जादूगार

१७) अस्वलाचा खेळ करणा-याला काय म्हणतात?

     - दरवेशी

१८)माकडाचा खेळ करणा-याला काय म्हणतात?

     - मदारी

१९)सापाचा खेळ करणा-याला काय म्हणतात?

    - गारूडी

२०) पंचवीस वर्षानंतर साजरा होणा-या महोत्सवाला काय म्हणतात?

- रौप्य महोत्सव 

२१) पन्नास वर्षांनंतर साजरा होणा-या महोत्सवाला काय म्हणतात?

-  सुवर्ण महोत्सव

२२) पंचाहत्तर वर्षानंतर साजरा होणा-या महोत्सवाला काय म्हणतात?

- अमृत महोत्सव 

२३ )शंभर वर्षानंतर साजरा होणा-या महोत्सवाला काय म्हणतात?

- शताब्दी महोत्सव

२४) नदी कशी तयार होते?

- असंख्य ओहोळ एकत्र येऊन नदी तयार होते. 

२५) झरा कशाला म्हणतात ?

- जमिनीखालचे पाणी काही ठिकाणी जमिनीतून बाहेर पडते . त्याला झरा म्हणतात. 

२६) जलरूपांची नावे सांगा.

- झरा , ओढा, नदी,  तळे,  जलाशय, खाडी,  समुद्र,  महासागर 

२७) भूरूपांची नावे सांगा .

- पर्वत, शिखर, डोंगर, टेकड्या, पठारे, मैदाने, खिंड, दरी 

२८) धरण कशाला म्हणतात?

- नदीचे वाहणारे पाणी भिंत बांधून अडवले जाते त्याला धरण म्हणतात.

२९ )  भारताचा  राष्ट्रीय  पक्षी  कोणता  ?

-    मोर 

३०   )  भारताचा  राष्ट्रीय  प्राणी  कोणता  ?

-    वाघ 

३१ )   भारताचे   राष्ट्रीय  फूल कोणते ?

-   कमळ 

No comments:

Post a Comment