वाक्यप्रचार

१) शेतात राबणे - शेतात कष्ट करणे
२) शाबासकी देणे - कौतुक करणे
३) घाम गळणे - कष्ट करणे
४) अधीर होणे - उत्सुक होणे
५) वाया जाणे - फुकट जाणे
६) सैर करणे - फेरफटका मारणे
७)निधन होणे - मरण पावणे
८) गोडी लावणे - आवड निर्माण करणे
९) मनाई असणे - बंदी असणे
१०) नवल वाटणे - आश्चर्य वाटणे
११) तोंड भरून कौतुक करणे -  खूप स्तुती करणे
१२) तारीफ होणे - कौतुक होणे , वाहवा करणे
१३) पोटाशी धरणे- रक्षण करणे
१४) भेदरून जाणे - घाबरून जाणे
१५) जीव वाचवणे - जीव शाबूत ठेवणे
१६) धमाल उडणे - मजा येणे, आनंद वाटणे
१७ ) डोळे ओले होणे - रडणे
१८) छळ करणे - त्रास देणे
१९ ) डोळे पाणावणे - डोळ्यांत अश्रू येणे
२०) हुरहूर लागणे - काळजीने अस्वस्थ होणे
२१ ) तक्रार करणे - फिर्याद करणे
२२) आराम करणे - विश्रांती घेणे
२३) काटकसर करणे - बचत करणे
२४) जिवापाड प्रेम करणे - खूप प्रेम करणे
२५) विश्रांती घेणे - विसावा घेणे
२६ ) आश्चर्यचकीत होणे - अचंबित होणे , नवल वाटणे
२७ ) कुशीत शिरणे - पोटाशी प्रेमाने बिलगणे
२८ ) गट्टी करणे - दोस्ती करणे
२९ ) कबूल करणे - मान्य करणे
३० ) आळ घेणे - आरोप करणे , ठपका ठेवणे
३१ ) कौतुक करणे - शाबासकी देणे

No comments:

Post a Comment