मुख्याध्यापकांसाठी

शिक्षकांसाठी

शाब्दिक मनोरंजक उखाणे

शासन निर्णय

स्वाध्याय

Mp3 गीते

स्वाध्याय

WhatsApp Group

उपयुक्त वेबसाईट

Pages

परिपाठ

ऑनलाईन चाचणी

विद्यार्थी अभ्यास

Learn Study From Home

संदेश

तंत्रस्नेही

ई वर्तमानपत्रे

स्वनिर्मित व्हिडीओ

Privacy Policy

गुरुवर्य सप्तरंगी परिपाठ

🌸🌷🌸🌷🌸🌷🌸🌷
------------------------------------------ 
  🎄 *आजचा परिपाठ🎄
-----------------------------------------
         🔅 *पंचांग* 🔅
 तिथी - कार्तिक षष्ठी
 पक्ष - कृष्ण 
 शके - १९४६
 नक्षत्र : पुष्य 
 सूर्योदय - ६ वा.४५मि.
 सूर्यास्त - ५ वा.५३ मि.
 दिनांक - २१ /११/२०२४
 वार - गुरूवार  
 महिना : नोव्हेंबर
 ----------------------------------------
      🔅 *सुविचार* 🔅
जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक रहा.
Rather than being honest with the world Be honest with yourself first.
------------------------------------------
       🔅 दिनविशेष 🔅 
२१ नोव्हेंबर  महत्वाच्या घटना :
१९७२: दक्षिण कोरियाने नवीन संविधान अंगीकारले.
१९७१: भारीतय वायुदलाची पाकिस्तानी सैन्याशी बांगलादेश मुक्ती युद्धातील गरीबपुरच्या लढाईत पहिली चकमक.
पाकिस्तानचा सपशेल पराभव.
१९६२: भारत चीन युद्ध भारतीय प्रदेशावर आक्रमण करणाऱ्या चीनने १९ नोव्हेंबर रोजी जाहीर केलेली एकतर्फी युद्धबंदी अमलात आली.
२१ नोव्हेंबर जन्मदिन : 
 १९८७: ईशा करवडे - भारतीय बुद्धीबळपटू
१९२७: शं. ना. नवरे - लेखक 
१९२६ः प्रेम नाथ - भारतीय अभिनेते 
१९२४: मिल्का प्लानिंक - युगोस्लाव्हिया
देशाचे ७वे पंतप्रधान 
१९१०: छ्यान चोंग्शू - चीनी भाषेतील लेखक
१८९९: हरेकृष्णा महाबत - ओडिशाचे पहिले
मुख्यमंत्री 
१६९४: व्हॉल्तेर - फ्रेंच तत्त्वज्ञानी 
२१ नोव्हेंबर निधन :
 २०१५: अमीन फहीम - भारतीय-पाकिस्तानी कवी आणि राजकारणी 
१९९६: अब्दूस सलाम - पाकिस्तानी
भौतिकशास्त्रज्ञ, नोबेल विजेते एकमेव एकमेव मुस्लिम - नोबेल पुरस्कार 
पाकिस्तानी, विज्ञानातील नोबेल विजेते
१९७०: सर चंद्रशेखर वेंकट रमण - भारतीय
भौतिकशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार 
१९६३ः चिंतामण विनायक जोशी - प्रसिद्ध
विनोदी लेखक 
-----------------------------------------
       🔅 *बातम्या* 🔅
बिटकॉइन घोटाळ्यातील ऑडिओ क्लिपमध्ये आवाज सुप्रिया सुळे आणि पटोलेंचाच; अजित पवारांचा दावा

पुणे जिल्ह्यात दुपारी १ वाजेपर्यंत २९.०३ टक्के मतदान.

गडचिराेली - मुलचेरा तालुक्यात १११ वर्षांच्या आजीने प्रत्यक्ष बुथवर जाऊन केले मतदान

दुपारी दीड वाजेपर्यंत अहिल्यानगर जिल्ह्यात सरासरी ३२ टक्के मतदान

महाविकास आघाडीमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघाचे उमेदवार केदार दिघे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांविरोधात कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

कोल्हापुरातील शिरोलीत भगवी टोपी घालण्यावरुन हिंदूत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते आणि पोलिस यांच्यात वाद

मुलुंड म्हाडा कॉलनीत राहणाऱ्या प्रणव पालवे (२१) या तरुणाने दोन्ही डोळ्यांनी दिसत नसतानाही पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावला.
------------------------------------------
  🎄 **व्यक्तीविशेष* 🎄
     🔅 शं. ना. नवरे 🔅
लेखक, नाटककार शं. ना. नवरे
शंकर नारायण नवरे उर्फ शन्ना हे मराठी लेखक, नाटककार व पटकथाकार होते. त्यांचा जन्म २१ नोव्हेंबर १९२७ रोजी ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथे झाला. प्रामुख्याने शहरी मध्यमवर्गीय माणसाच्या जिव्हाळ्याच्या विषयांवर आणि भावविश्वावर त्यांनी लेखन केले. ‘आनंदाचं झाड’ हे त्यांच्या एका पुस्तकाचे नाव त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे असेच होते. शन्ना म्हणजे आनंदी वृत्ती, शन्ना म्हणजे प्रसन्नता, शन्ना म्हणजे उत्साह असेच एकूण त्यांचे चालणेबोलणे असे. त्यांचे लिखाण हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणेच आनंददायी, सकारात्मक आणि तजेलदार होते.
अस्सल डोंबिवलीकर असलेल्या शन्नांनी ठाणे, मुंबई आणि तिथल्या मध्यमवर्गीय आणि पांढरपेशा माणसांच्या दैनंदिन समस्या जवळून पाहिल्या, अनुभवल्या होत्या आणि त्याचे यतार्थ चित्रण त्यांच्या लेखनातून झालेले दिसून येते. ‘तिळा उघड’, ‘जत्रा’, ‘कोवळी वर्षं’, ‘इंद्रायणी’, ‘सखी’, ‘खलिफा’, ‘भांडण‘, ‘बेला’, ‘झोपाळा‘, ‘वारा’, ‘निवडुंग’, ‘परिमिता’, ‘मनातले कंस’, ‘शहाणी सकाळ’, ‘बिलोरी’, ‘मार्जिनाच्या फुल्या’, ‘अनावर’, ‘एकमेक’, ‘मेणाचे पुतळे’, ‘सर्वोत्कृष्ट शन्ना’, ‘तिन्हीसांजा’, ‘शांताकुकडी’, ‘कस्तुरी’, ‘पर्वणी’, ‘झब्बू’, ‘पाऊस’, ‘निवडक’, ‘पैठणी’, असे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत.
‘एक असतो राजा’, ‘मन पाखरू पाखरू’, ‘धुक्यात हरवली वाट’, ‘नवरा म्हणू नये आपला’, ‘ग्रँड रिडक्शन सेल’, ‘सुरुंग’, ‘धुम्मस’, ‘सूर राहू दे’, ‘गुंतता हृदय हे’, ‘हवा अंधारा कवडसा’, ‘गहिरे रंग’, ‘गुलाम’, ‘वर्षाव’, ‘रंगसावल्या’, ‘हसत हसत फसवुनी’, ‘मला भेट हवी हो’, ही त्यांची नाटके प्रसिद्ध आहेत. ‘घरकुल’, ‘बाजीरावचा बेटा’, ‘बिरबल माय ब्रदर’ (इंग्रजी), ‘कैवारी’, ‘हेच माझं माहेर’, ‘असंभव’ (हिंदी), ‘कळत नकळत’, ‘जन्मदाता’, ‘निवडुंग’, ‘सवत माझी लाडकी’, ‘तू तिथं मी’, ‘झंझावात’, ‘मी तुझी तुझीच रे, ‘एक उनाड दिवस’, ‘आनंदाचं झाड’ यांसारख्या चित्रपटांच्या कथा त्यांच्याच होत्या. पु. भा. भावे पुरस्कार, नाट्यभूषण पुरस्कार, असे अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार त्यांना मिळाले. अशा या प्रतिभावान लेखकाचे २५ सप्टेंबर २०१३ रोजी निधन झाले.
---------------------------------------
   🎄 *सामान्यज्ञान* 🎄
      आयुर्वेदिक वनस्पती 
         🔅घेवडा 🔅  
घेवडा ही भारतात उगवणारी एक भाजीची वनस्पती आहे. या वनस्पतीच्या एका प्रकारास श्रावणात शेंगा येतात म्हणून त्या प्रकारास 'श्रावणघेवडा' म्हणतात. श्रावणघेवड्यास कोल्हापुरात बिनीस, इंग्रजीत फ्रेंच बीन्स आणि हिंदीत फरसबी म्हणतात. घेवड्याच्या शेंगाची भाजी करतात.
----------------------------------------
      🔅 *वाक्प्रचार* 🔅
 कबूल करणे - मान्य करणे
----------------------------------------
         🔅 *म्हण* 🔅
 खायला काळ भुईला भार - निरोद्योगी मनुष्य सर्वांना भारभूत होतो .
-----------------------------------------
       🔅इंग्रजी प्रश्न 🔅
1)Name the National fruit of India?
Ans. Mango
2) What is the National song of India?
Ans. Vande Mataram
3) Who designed the National
Flag of India?
Ans. The flag was designed by
Pingali Venkayya.
4) Name the National game of India?
Ans. India does not have an official National Game.
5) Name the National tree of India?
Ans. Banyan tree
------------------------------------------
       🎄 *प्रार्थना*🎄
🔅गगनसदन तेजोमय    🔅
 गगनसदन तेजोमय तिमिर हरून करुणाकर दे प्रकाश देई अभय

छाया तव, माया तव हेच परम पुण्यधाम वाऱ्यातून ताऱ्यांतुन वाचले तुझेच नाम जगजीवन जनन-मरण हे तुझेच रूप सदय

वासंतिक कुसुमांतून तूच मधुर हासतोस मेघांच्या धारांतून प्रेमरूप भासतोस कधी येशील चपलचरण वाहिले तुलाच हृदय

भवमोचन हे लोचन तुजसाठी दोन दिवे कंठातील स्वर मंजुळ भावमधुर गीत नवे सकलशरण मनमोहन सृजन तूच, तूच विलय
-----------------------------------------
      🔅मनाचे श्लोक 🔅
बहू हिंडतां सौख्य होणार नाहीं।
शिणावे परी नातुडे हीत कांहीं॥
विचारें बरें अंतरा बोधवीजे।
मना सज्जना राघवीं वस्ति कीजे॥४१॥

बहुतांपरी हेंचि आतां धरावें।
रघूनायका आपुलेसे करावें॥
दिनानाथ हें तोडरीं ब्रीद गाजे।
मना सज्जना राघवीं वस्ति कीजे॥४२॥

मना सज्जना एक जीवीं धरावें।
जनी आपुलें हीत तूवां करावें॥
रघूनायकावीण बोलो नको हो।
सदा मानसीं तो निजध्यास राहो॥४३॥

मना रे जनीं मौनमुद्रा धरावी।
कथा आदरे राघवाची करावी॥
नसें राम ते धाम सोडूनि द्यावे।
सुखालागिं आरण्य सेवीत जावे॥४४॥

जयाचेनि संगे समाधान भंगे।
अहंता अकस्मात येऊनि लागे॥
तये संगतीची जनीं कोण गोडी।
जिये संगतीनें मती राम सोडी॥४५॥
------------------------------------------
     🎄 बडबडगीत 🌲 
 🔅झुक झुक अगीनगाडी 🔅
 झुक झुक झुक झुक अगीनगाडी
धुरांच्या रेघा हवेत काढी
पळती झाडे पाहूया
मामाच्या गावाला जाऊया

मामाचा गाव मोठा
सोन्याचांदीच्या पेठा
शोभा पाहुन घेऊया

मामाची बायको गोरटी
म्हणेल कुठली पोरटी
भाच्यांची नावे सांगूया

मामाची बायको सुगरण
रोज रोज पोळी शिकरण
गुलाबजामुन खाऊया

मामा मोठा तालेवार
रेशीम घेईल हजार वार
कोट विजारी लेऊया
------------------------------------------
         🌲समूहगीत🌲 
   🔅हे राष्ट्र देवतांचे 🔅
हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे आचंद्रसूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे ।।धृ.।।

कर्तव्यदक्ष भूमी, सीतारघूत्तमाची रामायणे घडावी, येथे पराक्रमाची शिर उंच उंच व्हावे, हिमवंत पर्वताचे आचंद्रसूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे ।।१।।

येथे नसो निराशा, थोड्या पराभवाने पार्थास बोध केला, येथेच माधवाने हा देश स्तन्य प्याला, गीताख्य अमृताचे आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे ||२|| ,

येथेच मेळ झाला, सामर्थ्य संयमाचा येथेच जन्म झाला, सिद्धार्थ गौतमाचा हे क्षेत्र पुण्यदायी, भगवान् तथागताचे आचंद्रसूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे ||३||

हे राष्ट्र विक्रमाचे, हे राष्ट्र शांततेचे सत्यार्थ झुंज घ्यावी, या जागत्या प्रथेचे येथे शिवप्रतापी, नरसिह योग्यतेचे आचंद्रसूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे ||४||

येथे परंपरांचा सन्मान नित्य आहे जनशासनातळींचा पायाच 'सत्य' आहे येथे सदा निनादो, जयगीत जागृताचे आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे ||५||
-----------------------------------
      🌲 *बोधकथा*🌲  
    🔅उंदराची टोपी 🔅 
उंदराची टोपी एक होता उंदिरमामा. रस्त्याने जाताना त्याला मिळाले एक फडके.फडके घेऊन तो गेला धोब्याकडे. धोब्याला म्हणाला 'धोबीदादा, धोबीदादा माझे फडके धुवून दे. धोब्याने फडके धुवून दिले. मग उंदिरमामा गेला शिंप्याकडे. 'शिंपीदादा, 'शिंपीदादा, शिंपीदादा मला एक छानशी / टोपी शिवून दे तिला रंगीत गोंडेही लाव. शिंप्याने उंदिरमामाला टोपी शिवून दिली. उंदिरमामाने टोपी डोक्यावर घातली एक ढोलके घेतले. ते वाजवत तो गाणे गाऊ लागला ' राजाच्या टोपीपेक्षा माझी टोपी छान. ढुम,ढुम,ढुमक !' राजाने हे ऐकले. तो शिपायांना म्हणाला ' जा रे, त्या उंदराला पकडून आणा.' शिपायांनी
उंदिरमामाला पकडले. दरबारात आणले. त्याची टोपी काढून राजाकडे दिली. मग उंदिरमामा म्हणाला 'राजा भिकारी, माझी टोपी घेतली. ढुम,ढुम,ढुमक !' हे ऐकून राजा खूपच रागावला. त्याने उंदराकडे टोपी भिरकावली. उंदिरमामाने टोपी पुन्हा डोक्यावर घातली व तो गाणे गाऊ लागला 'राजा मला भ्याला. माझी टोपी दिली. ढुम,ढुम,ढुमक !' हे गाणे गात गात तो राजवाडयातून निघून गेला
------------------------------------------
       🔅 प्रश्नमंजुषा 🔅
१) हदयविकार असणाऱ्या व्यक्तीसाठी कोणते तेल उपयुक्त आहे?
उत्तर : करडई
२) वातावरणात कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण किती टक्के आहे ?
उत्तर- ०.०४ टक्के
३) खाद्यपदार्थात खाण्याच्या सोड्याचा सर्वाधिक वापर केल्यास कोणत्या
जीवनसत्वाचा नाश होतो?
उत्तर - 'क' जीवनसत्व
४) निद्रानाश हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मनुष्यात
आढळतो?
उत्तर- 'ब' जीवनसत्व
५) हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व
आवश्यक असते ?
उत्तर:' ड' जीवनसत्व
🔸🔸  🔸🔸🔸🔸🔸🔸
---------------------------------------

42 comments:

  1. एक परिपूर्ण ब्लॉग ...👌👌

    ReplyDelete
  2. अतिशय सुंदर व परिपूर्ण रचना केलेली आहे. अभिनंदन भागवत सर.💐💐👌👌💐💐👌👌

    ReplyDelete
  3. खूप छान सर 👌👌

    ReplyDelete
  4. दैनंदिन परिपाठ उपक्रम हे विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या भावी आयुष्यातील वाटचालीस नकळत संस्कार प्रदान करत असते,आणि एक सज्जन नागरिक तयार होण्यास याच संस्कारांची अत्यन्त गरज आहे, आणि तेच संस्कार परिपाठ या माध्यमातून आपण देत असतो, तुमचे दैनंदिन परिपाठ आम्हाला खूप उपयुक्त ठरते, thanks bhagwat sir,

    ReplyDelete
  5. आपला परीपाठ इंग्रजी मधून मीळतो का ?

    ReplyDelete
  6. खूप खूप छान माहिती असते...

    ReplyDelete
  7. खूपच सुंदर परिपाठ,,,

    ReplyDelete
  8. खूपच छान दैनिक परिपाठ रचना आहे. प्रत्येक घटकाचा अंतर्भाव आहे.

    ReplyDelete
  9. अतिशय सुंदर व परिपूर्ण रचना केलेली आहे. अभिनंदन भागवत सर.💐💐👌👌💐💐👌👌

    ReplyDelete
  10. खुप छान सर

    ReplyDelete
  11. अतिशय परिपूर्ण असा दैनिक परिपाठ असतो. द्यावेत तेवढे धन्यवाद कमीच आहेत. एक विनंतीवजा सूचना करावीशी वाटते- सुविचार आणि सामान्य ज्ञान प्रश्न यांमध्ये पुनरावृत्ती होऊ नये.

    ReplyDelete
  12. Thank sirji 🙏गुरुवर्य सप्तरंगी परिपाठ शिक्षकांसाठी एक मार्गदर्शक म्हणून काम करत आहे. आपण आपल्या पद्धतीने, कल्पकतेने त्यात बदल करून शाळेत परिपाठ घ्यावा.

    ReplyDelete
  13. कृपया सुविचार व सामान्य ज्ञान मधील प्रश्न सतत तेच तेच येत आहेत, त्यांची पुनरावृत्ती होऊ नये, ही अपेक्षा!

    ReplyDelete
  14. खूप छान आहे

    ReplyDelete
  15. अतिशय सविस्तर व उपयुक्त परिपाठ

    ReplyDelete
  16. अतिशय सुंदर

    ReplyDelete