मुख्याध्यापकांसाठी

शिक्षकांसाठी

शाब्दिक मनोरंजक उखाणे

शासन निर्णय

स्वाध्याय

Mp3 गीते

स्वाध्याय

WhatsApp Group

उपयुक्त वेबसाईट

Pages

परिपाठ

ऑनलाईन चाचणी

विद्यार्थी अभ्यास

Learn Study From Home

संदेश

तंत्रस्नेही

ई वर्तमानपत्रे

स्वनिर्मित व्हिडीओ

Privacy Policy

सुविचार

सुविचार
१) मानवतेची सेवा हीच श्रेष्ठ ईश्वर सेवा होय .
२) निसर्ग हाच मानवाचा गुरू आहे.
३) स्वयं शिस्तीमुळे हमखास यश मिळते.
४) दृष्ट माणूस आनंदी कधीच नसतो.
५) जननी व जन्मभूमी ही स्वर्गा पेक्षाही प्राणप्रिय असते.
६) बुद्धीच्या वाढीबरोबरच अंतःकरणाचाही विकास करा.
७) संकटांना भिऊ नका , संकटांना संधी मानून त्यावर मात करा.
८) चालणाऱ्याचे भाग्यही चालते.
९) इतरांना सुखी करण्याच्या प्रयत्नात सुख तुमच्याकडे आपण होऊन चालत येईल.
१०) अंधारच नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काहीच किंमत उरली नसती .
११) प्रामाणिकपणा हे उत्तम रत्न आहे मात्र बाजारात त्याला किंमत नसते.
१२) सामर्थ्यवान माणूस काम करत असतो आणि दुबळा माणूस फक्त उपदेश करत राहतो.
१३) शिक्षणाचा दर्जा शिक्षक कसे शिकवतात यावर अवलंबून असतो .
१४) श्रमाच्या वेलीलाच यशाची फुले येतात.
१५) स्वातंत्र्याचा इतिहास नेहमीच रक्ताच्या शाईने लिहिला जातो.
१६) इतरांवर अन्याय करण्यापेक्षा तोच अन्याय आपण स्वतःच सहन करणे अधिक चांगले. 
१७)शिक्षण शब्दाचा खरा अर्थ म्हणजे बुद्धी, प्रतिभा आणि मानसिक वृत्तीचा खरा विकास होय.
१८) जुना इतिहास घोकण्यापेक्षा ,नवा इतिहास निर्माण करणे गरजेचे आहे .
१९) जगात फक्त ज्ञानाची किंमत होते, अज्ञानाची नाही.
२०) मनाला आनंद देण्याचा कोणत्याही पदार्थाचा गुण म्हणजेच सौंदर्य
२१) लहान दु:खे बोलकी असतात मात्र मोठी दु:खे मुकी असतात.
२२) ह्रदयात अपार प्रेम असलं की सर्वत्र मित्र
२३) खोटी टीका करू नका , नाहीतर प्रतिटीका ऐकावी लागेल  २४) वैभव त्यागात असते, संचयात नाही.
२५) प्रामाणिकपणे परिश्रम करण्यातच प्रतिष्ठा असते.
२६) मोहाचा पहिला क्षण , ही पापाची पहिली पायरी असते
२७) मान मिळवण्यापेक्षा त्यास पात्र असणे अधिक चांगले 
२८) शिकणाऱ्याला शिकवावं लागत नाही तो स्वतःहून शिकतो.
२९) काट्याविना गुलाबाचा कोमलपणा व्यर्थ असतो.
३०) दोन्ही काटे नसलेले घड्याळ म्हणजे आळशी मनुष्य होय.
३१)व्यायामामुळे बुद्धी आणि मन दोहोंचे सामर्थ्य प्रभावी होते.
३२)अनुभव मुर्खालाही शहाणा बनवतो परंतू अनुभवातून जो शिकवण घेत नाही तो महामूर्खच असतो.
३३) आयुष्यातील अडचणी सोडविण्यास समर्थ असते तेच शिक्षण होय.
३४) माणूस म्हणजे गुण व दोष यांचे मिश्रण आहे.
३५) ज्ञान मिळाल्यावरही शहाणपण यायला वेळच लागतो.

1 comment: